सारंगखेड्याचा ‘चेतक महोत्सव’ १२ डिसेंबरपासून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |


 

 

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

 

मुंबई : नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे येत्या १२ डिसेंबरपासून 'चेतक महोत्सव' सुरु होत आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना या भागात आकर्षित करुन उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल,अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. येत्या बुधवारी (१२ डिसेंबर) मंत्री रावल आणि पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.

 

सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाच्या वर्षीही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. चेतक महोत्सव समिती आणि एमटीडीसी यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी घोड्यांच्या बाजारासोबत शस्त्रास्त्र प्रदर्शन, घोड्यांच्या स्पर्धा, पेंटींग स्पर्धा, फोटो प्रदर्शन, घोडेस्वारी, टेंट सिटी, लावणी महोत्सव, कव्वाली महोत्सव यासारखे अनेक कार्यक्रम होणार आहेत. ८ जानेवारी २०१९ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन रावल यांनी केले आहे.

 

महोत्सवाचे प्रमुख आकर्षण

 

* देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी खास पहाडी घोडेस्वारीची संधी

 

* निवासासाठी लक्झरी टेंटसह डॉर्मिटरीचीही व्यवस्था

 

* दोन विशेष कॅमेरे करणार हेड काऊंट, त्यामुळे यात्रेला येणाऱ्या पर्यटकांची नेमकी संख्या मोजता येणार

 

* हॉर्स लव्हर्स, क्लब्ज, ब्रिडर्स यांचा डेटा बेस, त्यामुळे जातिवंत अश्वांची पारख करण्यास मदत

 

* स्थानिक महिलांसाठी उद्योजकता कार्यशाळा

 

* स्थानिक कलाकारांसाठी मुक्त कला मंच

 

* स्थानिक अन्नपदार्थांचे फूड कोर्ट

 

* पुरातन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@