राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोलीसाला ‘गडचिरोली’ धमकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |
 
 

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीवेळी महापालिकेच्या चौकात सोडण्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे आमदार हसन मुश्रीफ आणि करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यात बाचाबाची झाली. उपअधिक्षक साहेब, 'आम्ही नोकऱ्या करतो, राजकारण नाही. गडचिरोलीला नव्हे तर घरी जाईन, पण तुम्ही वर्दीवर यायचं नाही, घरी जा', अशा शब्दात गुरव यांनी आमदार मुश्रीफ यांना सुनावले. दरम्यान यावेळी आमदार सतेज पाटील यांचाही पोलिसांशी वाद झाला.

 

यामुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर एकच तणाव निर्माण झाला होता. पालिका सभागृहात किंवा चौकात जाणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्र असल्याशिवाय सोडायचे नाही, असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल यांनी दिल्याने पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव आपले कर्तव्य बजावत होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी गुरव यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, वसंत बाबर यांच्यासह मोठा फौजफाटा प्रवेशद्वारावर होता. साधारण सोमवारी सकाळी १०.३० सुमारास एका खासगी आराम बसमधून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे फेटे बांधून आगमन झाले. या बसच्या पुढे आ. पाटील व आ. मुश्रीफ यांच्या गाड्या होत्या. या दोघांच्या गाडीत महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवार बसले होते. नगरसेवकांनी ओळखपत्र दाखवून आत जाण्याची सुचना पोलिसांनी केली. त्याचवेळी मुश्रीफ व आ. पाटील हेही आत जाण्यासाठी निघाले. त्यावेळी गुरव व इतर पोलिसांनी त्यांना रोखून तुम्हाला आत जाता येणार नाही असे सांगतिले. यावरून सुरूवातील या दोन्हीही आमदारांचा पोलिसांशी जोरदार वाद झाला.

 
 
 
 

त्यातच आ. मुश्रीफ यांनी तुम्हाला गडचिरोली दाखवायला पाहीजे असा टोला गुरव यांना लगावला. त्यामुळे संतप्त झालेल्या गुरव यांनी मुश्रीफ यांच्या दिशेने जाऊन साहेब, 'गडचिरोली नाही तर घरी जायची तयारी आहे. तुम्ही आमच्या वर्दीवर यायचे नाही, आम्ही नोकऱ्या करतो, राजकारण नाही, तुम्ही घरला जा', अशा शब्दात गुरव यांनी मुश्रीफ यांचा समाचार घेतला.

 

तणावाच्या वातावरणात आमदार पाटील यांचाही पोलिसांशी वाद झाला. वाद सुरू असतानाच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही हा नियम लावा. त्यांच्यासाठीही हा नियम लावा, असे आ. पाटील यांनी पोलिसांना सांगितले. तोपर्यंत पोलीस निरीक्षक सावंत यांनी मुश्रीफ यांना शांत करत बाजूला नेले. त्यानंतर आ. मुश्रीफ व आ. पाटील महापालिके बाहेरच एका बाजूला थांबून राहीले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@