महापालिका निकाल २०१८ : धुळ्यात भाजपच; नगरमध्ये मुसंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |
 
 

धुळे भाजप आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी करूनही धुळे महानगरपालिकेत भाजपने विरोधी पक्षांचा धुव्वा उडवला. धुळे महापालिकेत भाजपने भाजपने ४० जागांवर विजय मिळवला. तर १० जागांवर आघाडी मिळवली आहे. आमदार अनिल गोटे मात्र, यांनी पराभवाचे खापर ईव्हीएम फोडले. भाजपचा पॅनल टू पॅनल भागात दहा जागांवर विजय झाला आहे.

धुळे महापालिकेचा बालेकिल्ला कोण राखणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष होते. धुळे महापालिकेतील ७४ जागांसाठी एकूण ३५५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते. धुळ्यामध्ये भाजपकडून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावळ यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारून निवडणुकीत लोकसंग्राम पक्षातर्फे सर्व जागा लढवल्या आहेत. माजी आमदार राष्ट्रवादीचे राजवर्धन कदमबांडे यांना महापालिकेची सत्ता कायम ठेवता येईल का याकडे धुळेकरांचे लक्ष लागून आहे.


 

अहमदनगरमध्ये भाजप आघाडीवर असेल असा विश्वास कार्यकर्ते आणि नेतेमंडळीनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान श्रीपाद छिंदम या ठिकाणी चारशे मतांनी पिछाडीवर आहे. या भागातील भाजपचे सुवेंद्र गांधी १४२ मतांनी आघाडीवर होते. भाजप या ठिकाणी १८ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना या ठिकाणी १७ जागांवर आघाडीवर आहे.

 

अहमदनगरमध्ये दुपारी १२ वाजून १० मिनिटांपर्यंतचा पक्षनिहाय कलः


राष्ट्रवादी - २१

भाजप १६

शिवसेना १९

बहुजन समाज पक्ष

काँग्रेस -

अपक्ष -

मनसे -

समाजवादी पक्ष -
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@