मुंबई विमानतळावर झाला ‘हा’ विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |



 
 
मुंबई : शनिवारी मुंबई विमानतळाच्या नावावर एका विक्रमाची नोंद करण्यात आली. २४ तासांमध्ये मुंबई विमानतळावर तब्बल १००७ विमानांचे उड्डाण आणि लँडिंग झाले. यापूर्वीदेखील मुंबई विमानतळावर अशा प्रकारचा विक्रम झाला आहे.  
 

मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नासाठी मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांमुळे मुंबई विमानतळावर येणाऱ्या खासगी विमानांची संख्या वाढली. त्यामुळे हा विक्रम झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरून दरतासाला ४८ विमानांचे उड्डाण किंवा लॅंडिंग होऊ शकते. तसेच मुंबई विमानतळावर असलेल्या दुसऱ्या राखीव धावपट्टीवरून दर तासाला ३५ विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होऊ शकते. अशी माहिती मिळाली आहे.

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचे ईशाचे लग्न पिरामल उद्योग समूहाच्या आनंद पिरामल यांच्याशी होणार आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी हे लग्न होणार असून लग्नासाठी आतापासूनच परदेशी पाहुणे मुंबईत दाखल होत आहेत. हिलरी क्लिंटन यांचेही या लग्नसोहळ्यासाठी मुंबईत आगमन झाले आहे. अमेरिकन गायिका बियॉन्से ही देखील ईशा अंबानीच्या लग्नासाठी सध्या मुंबईत आली आहे. ईशाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात बियॉन्सेचा परफॉर्मन्स असणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@