मल्ल्याची रवानगी होणार ‘या’ तुरुंगात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |
 

मुंबई : भारतातील विविध बॅंकांना नऊ हजार कोटींचा चुना लाऊन इंग्लंडला पसार झालेला विजय मल्ल्याचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. सरकारला प्रत्यार्पण करण्याच्या महत्वपूर्ण खटल्याचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.

 

लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात हा खटला सुरू असून खटल्याचा निकाल मल्ल्याच्या विरोधात गेल्यास त्याची मुंबईतील आर्थर रोड कारागृहात रवानगी केली जाणार आहे. विजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू झाली आहे, असे झाल्यास, युके येथील आलिशान घरातून तो थेट भारतातील तुरुंगाची हवा खाणार आहे.

 

आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक १२मध्ये त्याला ठेवण्यात येईल. या पूर्वी आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन येथील न्यायालयाला दिली आहे. याच ठिकाणी मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आले होते. विजय मल्ल्याने आपल्याला भारताच्या ताब्यात दिले जाण्याच्या भीतीने बँकांचे पैसे चुकते करण्याची भाषा सुरु केली आहे. त्यामुळे आज येणाऱ्या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@