नाटकातून भेटीला येणार 'लक्ष्या'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |



मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि विनोदाचा बादशाह सर्वांचा लाडका 'लक्ष्या' अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे. मराठी चित्रपटाला वेगळे वळण देण्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मोठा वाटा होता. रंगभूमी तसेच नाट्यक्षेत्रात एकाच वेळी दोन्ही ठिकाणी त्यांनी एक काळ गाजवला होता. त्यांना जाऊन आज १४ वर्षे झाली. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही लक्षात राहतात. अशा हुरहुन्नरी कलाकाराचा जीवनपट समोर येणार आहे आणि तोही रंगमंचावर. पुरुषोत्तम बेर्डे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच एका कलाकाराचे जीवनविश्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘लक्षातला लक्ष्या’ या नाटकाद्वारे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे चाहत्यांना पुन्हा एकदा रंगमंचावर अनुभवायला मिळणार आहे. पुरूषोत्तम बेर्डे या नाटकाची निर्मिती आणि लेखनाची धुरा सांभाळत आहेत. तर विजय केंकरे या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहेत. या नाटकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेचा लहानपणापासून ते अखेरपर्यंतचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. नाटकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं साकारली जाणार आहे.

 

नाट्यशास्त्राच्या ‘मेक बिलिव्ह थिअरी’वर हे चरित्र्यनाट्य अभिकथनातून उभे राहणार आहे. पुरुषोत्तम बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोन भावंडांमध्ये फोनवर संभाषण होणार असून त्यातूनच ‘लक्ष्या’चा जीवनप्रवास आपल्यासमोर मांडला जाणार आहे. या नाटकाची तालीम सध्या जोरात सुरू असून येत्या १६ डिसेंबरला म्हणजेच ‘लक्ष्या’च्या पुण्यतिथीला हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@