#IND vs AUS ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नमवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |
 

अॅडलेड : भारत-ऑस्ट्रेलिया अॅडलेड कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवत सामन्यावर विजय मिळवला. भारताने ठेवलेल्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास कांगारूंचा संघ अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाचा डाव २९१ धावांवर आटोपला. अखेर भारताने ३१ धावांनी हा सामना जिंकत या मालिकेत -० अशी आघाडी घेतली.

 

सोमवारी खेळाला सुरूवात झाली तेव्हा रविवारी नाबाद ११ वरून पुढे खेळत असलेला हेडने केवळ धावा केल्या. इशांत शर्माने त्याला रहाणेकडून झेलबाद करत माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या टिम पेनने शॉन मार्शला साथ देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चांगली भागिदारी होत असताना बुमराहने मार्शला बाद करत ही जोडी फोडली. उपहारासाठी खेळ थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या गडी गमावत १८६ धावा झाल्या होत्या. विश्रांतीनंतर मात्र, कांगारूंना जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. विश्रांतीनंतरच्या पहिल्याच षटकात बुमराहने टीम पेनलाही पंतकरवी झेलबाद करत माघारी पाठवले.

 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्यासाठी कमिन्स एकाकी झुंज देत होता. त्याला मिशेल स्टार्कही चांगली साथ देताना दिसत होता. एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला पुल करण्याच्या नादात स्टार्क रिषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर एकाकी झुंज देणारा कमिन्सनही बुमराहच्या गोलंदाजीवर कोहलीकडे स्लीपमध्ये सोपा झेल देत तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या लायनने आक्रमक खेळ करत ३८ धावा चोपल्या. मात्र, के. एल राहुलने आश्विनच्या गोलंदाजीवर हेजलवूडचा एक अप्रतीम झेल स्लिपमध्ये टिपला. या विकेटसह भारताने हा सामना आपल्या खिशात घातला.

 

सोमवारचा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. सामन्यात इशांत शर्मा एक तर बुमराह शमी आणि आश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट पटकावल्या. ऑस्ट्रेलियाकडून शॉन मार्शने सर्वाधिक ६० तर टिम पेनने ४१ धावा काढल्या. मात्र, भारतीय आक्रमणापुढे कांगारूंनी सपशेल हार मानली. या विजयासह भारताने या सामन्यांच्या मालिकेत - ने आघाडी घेतली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@