शेकडो मल्ल, सौष्ठवपटू घडविणारी सुसज्ज व्यायामशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |

अनेकांना सेना व पोलीस दलात संधी, रावेरच्या अंबिका बहुउद्देशीय मंडळ संचालित व्यायामशाळेची कामगिरी


रावेर : 
 
बलोपासना आणि पहेलवानकीसाठीही रावेर परिसर विख्यात आहे, ही किमया साधली आहे येथील शतकपूर्तीकडे वाटचाल करणार्‍या अंबिका बहुउद्देशिय मंडळ संचलित व्यायामशाळेने.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेल्या कार्यकर्त्यांकडे संस्थेचे व्यवस्थापन आहे, अध्यक्ष आहेत नाणावलेले पहेलवान व कुस्ती-कबड्डीपटू, वेटलिफ्टर भास्कर महाजन आणि व्यायामप्रेमी पदाधिकारी असे उपाध्यक्ष-रवींद्र कांतीलाल महाजन, सचिव-ललित कृष्णाजी चौधरी, सहसचिव - अशोक पुंडलिक पाटील आणि संचालक गेल्या काही दशकात येथे घराघरात हौशी व कसलेले, नाणावलेले मल्ल होते...त्यांची एकूण संख्या 800 ते हजारावर असेल. तर गेल्या वर्षात या व्यायामशाळेने घडवलेल्या 65 ते 70 सौष्ठवपटूंना शारिरिक पात्रता, क्षमता यांच्या जोरावर पोलीस विभागात तर अनेकांना सेनादलात नोकरीची संधी मिळाली आहे.
 
ब्रिटीश राजवटीत 1933 च्या सुमारास बभूतसिंह परदेशी या स्वत: कसलेल्या पहेलवान आणि शरीरसौष्ठवप्रेमी सद्गृहस्थांनी या व्यायामशाळेची मुहूर्तमेढ रोवली ती त्या काळी सध्याच्या आठवडेबाजार परिसरातील शेतजमिनीत. पोलीस दलातील निकम गुरुजी या प्रख्यात व्यायामपटूंनी त्यांना साथ दिली.
 
त्या शेतजमिनीत व्यायामप्रेमी हवा तो व्यायाम करीत. पुढे काही वर्षानी सध्याच्या अग्रसेन चौकातील नाला भागात त्या काळात पत्र्याचे शेड उभे राहिले. त्यात बलोपासना होत असे.
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाचा प्रसार ,नवी पिढी-नवे विचार यामुळे मल्लविद्या, बलोपासना, व्यायामाकडे ओढा वाढत गेला, महालक्ष्मी मंदिर परिसरात जेथे सध्या डॉ.ठाकरे यांचे हॉस्पिटल आहे, त्या जागी साधारणत: 1965 ते 80 या कालावधीत व्यायामशाळा उभी राहिली.
 
मल्लविद्या, पहेलवानकीतील रुची वाढत गेली, भास्कर महाजन यांचे मोठे काका रामदास लालचंद महाजन, राजाराम जाधव, सुकलाल गुजराथी, राधेशाम पांडे हे मागच्या पिढीतील त्यातील काही मल्ल... त्या सुवर्णकाळाच्या आठवणींचे साक्षीदार काही पहेलवान आजही आहेत.
 
 
पुढे 1992 पासून नगराध्यक्ष बबनशेठ अग्रवाल यांच्या अंत:करणात भिनलेले व्यायामप्रेम आणि उदारदृष्टीमुळे व्यायामशाळेला भव्य व अत्याधुनिक रुपडे प्राप्त झाले.
 
सध्या जेथे नपाची अग्निशामक यंत्रणा व कार्यालय आहे, त्या जागी व्यायामशाळा होती, तिला सध्याची जागा देत नपाने सध्याची वास्तू बांधून दिली. स्व.बबनशेठ अग्रवाल यांचा खेळाडूंना, पहिलवानांना आर्थिक व आवश्यक त्या स्वरुपात मदतीचा हात देण्याचा, पडेल ते सहकार्य करण्याचा वसा आणि वारसा त्यांचे उद्योजक सुपुत्र अतुल आणि अतुल अग्रवाल या बंधूद्वयांनी जपला आहे.
 
त्यांच्या समवेत भबूतसिंह राजपूत दादांचे नातू कमलसिंग (जे स्वत: उत्तम पहिलवान आहेत) आणि सुभाषसिंग तसेच पणतू आणि संस्थेचे संचालक यशपालसिंग हेही मौलिक सहकार्य करीत असतात.
 
 
सरदार जी.जी.हायस्कूलमधील क्रीडाशिक्षक विजय महाजन यांचेही मुलांना भरीव मार्गदर्शन लाभत असते. कारण ते स्वत: कुस्ती, कबड्डी, भारोत्तोलनचे उत्तम खेळाडू राहिलेले आहेत. त्यांच्यासह अन्य 20-25 मान्यवर व्यायामशाळेच्या वाटचालीत हवे तेव्हा मदतीला धावून येत असतात.
 
 
युवावर्गातील वाढती बेफिकीरी कमी करणे, त्यांना व्यसनांपासून दूर ठेवत सामाजिक कार्याकडे आकृष्ट करणे यासाठी उत्तम वातावरण निर्माण करावयाचे आहे.
 
त्यादृष्टीने भविष्यात अधिक सुसज्ज व अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे. त्यासाठी किमान 10 हजार चौरस फूट आकाराचा भूखंड मिळावा यासाठी नगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवत कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणे, याला प्राधान्यक्रम असेल.
 
 
पुढे शासनाच्या क्रीडाविषयक विविध योजना आणि अनुदानाद्वारे ही स्वप्नपूर्ती करावयाची आहे. याकामी दानशूर, शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, विशेषत: आमदार, खासदारांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
संपर्क- भास्कर महाजन 9890809010
लाल मातीचा हौद व्यायामशाळेत 25 प्रकारची उपकरणे आहेत, 10 प्रकारचा व्यायाम करता येईल, अशी व्यवस्था आहे. एकाच वेळी विविध उपकरणांद्वारे वा मशिन्सवर 50 मुले व्यायाम करु शकतात.
 
व्यायामशाळेतील लाल मातीच्या हौदाने दरवर्षी कितीतरी पहिलवान घडवले आहेत. परिसरातील हा एकमेव मातीचा हौद आहे. अनेकांना तो खुणावत असतो.आमदार हरिभाऊ जावळे यांनी भेट दिलेल्या रुग्णवाहिकेद्वारे दरवर्षी सुमारे 500 गरजूंंना मदत मिळते.
सामान्य घरांमधील जिद्दी विद्यार्थ्यांची बलोपासना सकाळी 5 ते 7 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळात वय 8 वर्ष व त्यापुढील व्यायायप्रेमींना प्रवेश असतो.
 
सकाळच्या सत्रात 100 पेक्षा अधिक तर सायंकाळी 200-225 वर युवावर्ग असतो. सायंकाळी बलोपासना करणार्‍यांमध्ये परिसरातल्या काही गावांमधील विद्यार्थी, युवक तसेच हाती पडेल ते काम करुन घरच्यांना मदत करीत शिक्षण घेणार्‍या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद व लक्षणीय समावेश असतो.
 
विशेष म्हणजे लहानपणापासून व्यायाम व सुडौल शरिरप्रकृतीची आस असणारी बालमंडळी अधिकृतरित्या प्रवेश नसला तरी जिज्ञासेने येत हलकाफुलका व्यायाम करते.
 
 
त्यांची व्यायामाची आवड टिकून राहावी, यासाठी काहींसोबत पालकही असतात अन्य व्यायामप्रेमी त्यांना कौतुकाने सहकार्य करतात.
@@AUTHORINFO_V1@@