सरकारने राममंदिराचा निर्णय घ्यावा ; अडचणी येतील त्या बघता येतील - सोलंकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |
 
 
सरकारने राममंदिराचा निर्णय घ्यावा ; अडचणी येतील त्या बघता येतील - सोलंकी
जळगाव, 10 डिसेंबर
अयोध्येतील राममंदिर हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रश्न आहे.गुलामगिरीची प्रतीके हटविली पाहिजे. सरकारने राममंदिराचा निर्णय घ्यावा. ज्या अडचणी येतील त्या बघता येतील असे प्रतिपादन बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक सोहनजी सोलंकी यांनी जळगाव तरुण भारतच्या कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीत  निलेश वाणी यांनी घेतलेल्या  मुलाखत प्रसंगी केले. 
अमळनेर येथे 10 डिसेंबरला हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सभेला संबोधित करण्यासाठी ते येथे आले असता त्यांनी जळगाव तरुण भारतच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी राममंदीर आणि त्याच्याशी जोडलेल्या अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली.
 
- राष्ट्रीय स्तरावर राजन्मभूमीचे आंदोलन नियोजनात्मक केले जात आहे, असे का ?
उत्तर - रामजन्मभूमीसाठी सन 1528 पासून लढाया सुरू आहेत. राम मंदिरासाठी मुख्यत: दोन प्रयत्न झाले. माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी, स्व.नरसिंहराव आणि चंद्रशेखर यांनी प्रयत्न केले होते. त्यातही सर्वाधिक प्रयत्न चंद्रशेखर यांनी केले. परंतु निर्णयाच्यावेळी ही मंडळी बैठक सोडून देत असत. उच्च न्यायालयात पहिला प्रयत्न झाला होता. मुस्लिमांनी लिखीत दिले होते की , जर खोदकामात मंदिराचे अवशेष आढळले तर जागा देवू पण ते सर्वोच्च न्यायालयात गेले. खरं तर , मुस्लिम आणि सरकारने त्यांचे कर्तव्य पूर्ण करायला हवे होते.
सर्वोच्च न्यायाल कारवाई टाळत होते. मुख्य न्यायाधीश सेवानिवृत्तीपूर्वी तरी निर्णय देतील अशी अपेक्षा हेाती. हा दुसरा प्रयत्न होता. कारण राममंदिर हा राष्टीय स्वाभिमानाचा प्रश्न आहे.सरदार पटेल यांनी सुध्दा मंदिरांचा जीर्णोध्दार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही प्रक्रिया लांबवली म्हणूनच ही भूमिका घ्यावी लागली, अन्यथा न्यायालयाच्या निर्णयाची काही काळ वाट पाहता आली असती.
 
- राममंदिराबाबत सरकारची भूमिका कशी वाटते ?
उत्तर – शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला यानंतर कायदा बनला, राममंदिराबाबतसुध्दा सरकारने प्रयत्न करावा. अडचणी आल्या तर त्या बघता येतील. त्या सोडविण्याचे मार्ग शोधता येतील.
 
- राममंदिराच्या जमिनीच्या विभागणीबद्दल आपले काय मत आहे ?
उत्तर - राममंदिराबाबत निर्णय देतांना न्यायालयाने तीन भागात जमिनीचे वाटप केले होते. जी कोणीही अशी मागणी केली नव्हती. आम्हाला वाटा नको संपुर्ण जमीन हवी आहे यासाठीच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.
 
- लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राममंदिराचा मुद्दा पुन्हा निघाला आहे त्याचा राजकारणाशी संबंध आहे का ?
उत्तर – देशात दरवर्षी कोठे न कोठे निवडणुका होतच असतात.राममंदिर हा विषय आम्ही सोडलेला नाही. लोकसभेतील सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सरकारने निर्णय घ्यावा या मागणीसाठी हुंकार सभा घेतल्या जात आहेत. न्यायालयाने निर्णय दिला असता किंवा समझोता होवून निर्णय झाला असता तर ही वेळ आली नसती. सर्वोच्च न्यायालयाने लांबवले नसते आणि लांबची तारीखही दिली नसती . उलट अजून वाट पाहिली असती.
या प्रकरणात कपिल सिब्बल राजकारण करीत आहेत. मंदिराच्या बाजूने निर्णय आला तर काँग्रेस सत्तेत येणार नाही हे त्यांना ठाऊक आहे म्हणूनच ते खोडा घालत असतात.
 
– विरोधी पक्ष राममंदिराबाबत मवाळ होत आहेत, याबाबत आपल्याला काय वाटते ?
उत्तर - सध्या सर्वच लोक मंदिरात जात आहेत. कारसेवकांवर गोळया चालवणारे मंदिरात जात आहेत. खा. राहुल गांधी जानवे घालत आहेत.त्यांनी राममंदिराच्या समर्थनाची घोषणा करावी. राममंदिरासाठी समर्थन द्यावे.मुस्लिमांचे विचारसुध्दा सकारात्मक होत आहेत. राममंदिराच्या समर्थनार्थ हजारो ई मेल आणि पत्रे अल्पसंख्य आयोगाला येत आहेत. हा विषय जेवढा लांब खेचाल तेवढा चिघळत जाणार आहे . पण हे सत्य आहे की, तरीही मंदिर बनणारच.
 
– 1992 च्या वेळेस असलेला उत्साह आताही लाभत आहे का ?
उत्तर - आजचा युवक देश आणि समाजासाठी काहीही करण्याच्या मनस्थितीत आहे. हुंकार सभाना सामान्य नागरिक आणि युवकांचा लाभणारा प्रतिसाद पाहता उत्साह कमी न होता अधिक वाढत असल्याचे दिसते. युवकांची संख्याही अधिक असल्याचे दिसून येते.
 
- सरकारने राममंदिरासाठी कायद केला नाही तर काय भूमिका घेणार ?
उत्तर - रणनिती त्याला म्हणतात जी योग्य वेळ आल्यानंतर उघडकरायला येते. उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. रा.स्व.संघ प्रमुखांनी त्यांची बाजू मांडली आहे. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा . 30 जानेवारी व 1 फेब्राुवारी रोजी प्रयाग येथे धर्मसभा होणार आहे.तेथे संत निर्णय घेतील. तो निर्णय अनुकूल किंवा प्रतिकुल असाही असू शकतो. राममंदिराचे आंदोलन संतांच्याच मार्गदर्शनात झाले आहे.संत जे सांगतील ते करणे आमचे काम आहे. देशात बजरंग दलाचे 40 लाख सदस्य आहेत. संतांच्या आदेशाचे ते पालन करतील, यात शंका नाही.
 
- राममंदिराचा प्रश्न या अधिवेशनात निकाली निघावा यासाठी कोणती कार्यवाही केली जात आहे ?
उत्तर - आम्ही राममंदिर मागत आहोत , भिक्षा नव्हे आज असे म्हणावे लागणे हेही दुर्देवी आहे. सरकार आणि रा.स्व.संघाचे बोलणे आमच्यासाठी आदेश आहे. देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांना राममंदिराबाबत निवेदने दिली आहेत. त्यात सर्वच पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. त्यामुळे या विषयास सर्वदूर चालना मिळून जनप्रबोधनही होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
आज सावदा येथे प्रबोधन
सावदा ता.रावेर येथे मंगळवार 11 रोजी दुपारी 4 वा . सोहनजी सोलंकी यांचे या संदर्भात प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@