अखेर विजय मल्ल्याला भारतात आणणार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |


 


लंडन : देशातील विविध बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून इंग्लंमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय माल्याच्या प्रत्यार्पणाला लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने मंजुरी दिली आहे. माल्याच्या प्रत्यापर्णाला लंडनमधील न्यायालयाने दिलेली परवानगी हे सीबीआयच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

 

न्यायालयाच्या निर्णयावर सीबीआय प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही लवकरात लवकर मल्ल्याला परत आणू याबद्दल सकारात्मक आहोत. आम्ही या प्रकरणावर खूप मेहनत घेतली आहे. प्रत्यार्पणासाठी पुरावे सादर करताना आम्हाला आत्मविश्वास होता असे म्हटले आहे.

 

‘किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावे घेतलेली बँकांची सुमारे ९,००० हजार कोटींची कर्जे बुडवून विजय माल्या हा इंग्लंडमध्ये पसार झाला होता. माल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली होती. तेव्हापासून माल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. या निकालाच्या वेळी हजर राहण्यासाठी ‘सीबीआय’चे सहसंचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखालील ‘सीबीआय’ व ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त तुकडी येथे आली आहे.

 

संबंधित बातमी वाचा...

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@