उदयनराजेंकडूनही आलेली धमकी : गुणरत्न सदावर्ते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |



 
 
मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सोमवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर मारहाण करण्यात आली. जालना जिल्ह्यातील वैद्यनाथ पाटील यांनी ही मारहाण केली असून त्यांना वेळीच अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
 

हा हल्ला माझ्यावर झालेला नसून तो न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. आजवर मला धमक्यांचे शेकडो फोन आले. उदयनराजे भोसले यांच्या नावाने देखील मला धमक्यांचे फोन आले होते.” असा गौप्यस्फोट अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती त्यांनी पोलीसांना दिली होती. सोमवारी सकाळीही सुनावणीपूर्वी पोलीसांना या धमक्यांबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून माहिती देण्यात आली होती. कारवाई थोडी लवकर केली असती तर हा हल्ला झाला नसता. असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. या हल्ल्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सुरक्षा देण्याचा आदेश दिला आहे. अशी माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.

 
 

पोलीसांकडे धमक्यांविषयी केलेल्या तक्रारीत सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांचे नावही दिले आहे. उदयनराजे भोसले हे मराठा समाजाचे नेतृत्व करत असल्यामुळे तक्रारीत त्यांचे नाव देण्यात आले असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. तसेच न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास असून मी घाबरत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे. मी मनात कोणतीही भीती सन बाळगता पुढील लढा लढत राहेन. असे सदावर्ते यावेळी म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@