फैजपूरला भावसार समाजाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |

फैजपूर :
 
येथील भावसार समाजातर्फे नुकतेच प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून न्याय्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले .या निवेदनात म्हटले आहे की अ‍ॅड. नितीन भावसार, योगेश वसंत भावसार ,वसंत शंकर भावसार, रा. फैजपूर समस्त पंच फैजपूर यांनी सीटी सं. नं. 344 या संस्थेच्या मालकीची मिळकत सीटी 290 ही हडप केली आहे.
 
या भ्रष्टाचारास भावसार समाजबांधवांनी विरोध केल्याचा राग येऊन तिघांनी खोटे गुन्हे दाखल करून समाजाची बदनामी केली आहे.
ही मिळकत त्याची नोंद धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सूची क्र. 1 मध्ये नोंद असताना तसेच भावसार बांधव व धर्मदाय आयुक्त यांची परवानगी न घेता योगेश भावसार याने संस्थेचे दप्तरातील कागदोपत्रात हेरफेरी करुन नितीन भावसार, वसंत भावसार यांनी मिळकत नावे लावून घेतली आहे.
 
अ‍ॅड. नितीन भावसार यांच्या नावे करून खरेदी-विक्रीचा गैरव्यवहार केल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रवीण भावसार, सुरेश भावसार, सुनील गोरे, गजानन गोरे, ऋषित गोरे, ललित वसंत, भावसार चित्रा, ललित भावसार, लीना मगरे, नलिनी मगरे, राजेश्री मगरे, सोनम मगरे यांच्या स्वााक्षर्‍या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@