'या'साठी केरळ ठरले देशातील पहिले राज्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |



केरळ : रविवारी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन केले. याचसोबत केरळ राज्य ४ आतंरराष्ट्रीय विमानतळ असलेले देशातील पहिले राज्य बनले आहे. कोचीन, त्रिवेंद्रम, कालिकत येथे याआधीपासून ३ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.

 

'एअर इंडिया एक्सप्रेस आयएक्स ७१५' हे कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून उडालेले पहिले व्यावसायिक विमान आहे. १८० प्रवाशांसह या विमानाने अबू धाबीला जाण्यासाठी रवाना झाले. या विमानाला झेंडा दाखवून दोन्ही मान्यवरांनी विमानतळाचे उद्घाटन केले. शेजारील राज्यांशी दळणवळण अगदी सोयीस्कर व्हावे आणि पर्यटनाला वाव मिळाला हे या विमानतळाचे उद्दिष्ट आहे. वायानाड, कन्नूर, कासारगोडे या शहरांना याचा फायदा होणार आहे. तसेच, मसाले आणि हातमाग उद्योगालाही याचा लाभ होऊ शकतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@