सिनियर जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |


 


न्यूयार्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे ते वडिल होते. यामुळे अमेरिकेत ते सिनियर बुश नावाने प्रचलित होते. बुश कुटुंबियांच्या प्रवक्त्यानी सिनियर बुश यांच्या निधनाची माहिती ट्विटरवरून दिली. दुसऱ्या महायुद्धातील कोल्ड वॉर संपविण्यात बुश यांचे मोलाचे योगदान होते.

 

अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांनी १९८९ ते १९९३ या कालावधीत अमेरिकेच्या विकासात भरीव योगदान दिले होते. राष्ट्राध्यक्षासोबत त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणूनदेखील काम पहिले. तसेच ते ते सीआयएच्या संचालकपदावरही कार्यरत होते. बुश यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@