मराठा आरक्षण विधेयक हा घाईघाईचा एकपात्री प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

सत्यशोधक ओबीसी परिषदेचा आरोप

जळगाव : 
 
मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले असले तरी हा घाईघाईने केलेला एकपात्री प्रयोग आहे, या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याने हा राजकीय भ्रम आहे, असा आरोप सत्यशोधक ओबीसी परिषद, जळगावचे अध्यक्ष ईश्वर मोरे आणि जनसंग्राम परिषदेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी आज शुक्रवारी दुपारी केला.
 
आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतील, मराठा समाज आनंदी होईल, असा राजकीय भ्रम निर्माण करण्यात राजकीय मंडळी यशस्वी ठरली असली तरी नजिकच्या काळात त्यांचे पितळ उघडे पडेल, असा आरोपही करण्यात आला.
 
एका बाजूला उदारवादी खासगीकरण मोठ्या प्रमाणात राबवायचे आणि दुसर्‍या बाजूला आरक्षणाची भाषा करायची, प्रत्यक्षात सरकारी शाळा बंद करायच्या हे उद्योग थांबवा.
आज ओबीसींची जनजागृती सभा
 
दरम्यान शनिवारी 1 डिसेंबरला दुपारी 2 वाजता पत्रकार भवनात दुपारी 2 वाजता ओबीसींची जनजागृती सभा होणार आहे, तिला ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
 
ओबीसी प्रवर्गाला आरक्षणाबाबत कुठलीही इजा होऊ नये...
 
आरक्षणाबाबत केंद्रीय मागास आयोगाकडून पुष्टी मिळणे आवश्यक आहे, हे विधेयक योग्य व वैध ठरो, असा आशावाद व्यक्त करण्यात आला, मात्र अन्य ओबीसी प्रवर्गाला आरक्षणाबाबत कुठलीही इजा होऊ नये, अशीच सत्यशोधक ओबीसी परिषदेची मागणी राहाणार आहे, असा पुनरुच्चारही मोरे, ठाकरे , भास्कर जुनागडे, जे.डी.ठाकरे यांनी केला.
@@AUTHORINFO_V1@@