लेवा पाटीदार समाजातर्फे विश्वस्तरीय वधू-वर परिचय महामेळावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |
जळगाव : 
 
लेवा पाटीदार समाजाची अग्रगण्य युवा संघटना लेवा नवयुवक संघातर्फे यावर्षीचा विश्वस्तरीय विवाहेच्छूक वूध-वर महामेळावा 2 डिसेंबर रोजी एम.जे.कॉलेजच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.देश-विदेशातील लेवा पाटीदार समाजबांधव या महामेळाव्यास उपस्थिती देत आहेत.
 
 
यात विवाहेच्छूक वधूंची संस्था 2250 तर वरांची सख्या 3250 हून अधिक आहे. परिचय पुस्तिकेत सध्या उपलब्ध आहे. त्यासाठी पटांगणावर भव्य मंडपात अत्याधुनिक क्लोज सर्किट टी.व्ही.ची सुविधा व विवाहेच्छूकांच्या परिचयासाठी भव्य व्यासपीठ राहील.
 
 
त्याचप्रमाणे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, आय.ए.एस., आय.पी.एस. आणि उच्चशिक्षीत, व्यापारी, उद्योजक व वैद्य क्षेत्रातील तज्ज्ञ यांचाही परिचय येथे होणार आहे. महामेळावा समाजातील सर्व स्तरांसाठी राहणार आहे. कोणताही भेदभाव नाही, हे महामेळाव्याचे वैशिष्ठ्य आहे.
 
 
उद्घाटक माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे असून प्रमुख पाहुणे लेवापाटीदार समाजाचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील, जिल्हा दूध विकास संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, खा.रक्षाताई खडसे, आ.हरीभाऊ जावळे, महापौर सीमा भोळे, आ. सुरेश भोळे, प्रसिद्ध सर्जन डॉ.ए.जी.भंगाळे, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, उद्योजक सुनील बढे, माजी महापौर ललित कोल्हे, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, सहविक्रीकर आयुक्त बी.एन.पाटील, उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मधुकर साखर कारखान्याचे चेअअरमन शरद महाजन, अ‍ॅड. प्रकाश पाटील, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, रेमंण्ड लि.जळगावचे वर्क्स डायरेक्टर अनिलकुमार नारखेडे आदी प्रमुख पाहुणे असतील.
 
 
अधिक माहितीसाठी लेवा नवयुवक संघाच्या मध्यवर्ती संपर्क केंद्र, हिमालय ट्रॅक्टर प्रा. सुभाष भोळे यांच्याशी संपर्क साधावा.
महामेळाव्यासाठी सर्व समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी,
 
असे आवाहन लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष व जळगावचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी यांनी आणि सहकारी कार्यकर्त्यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@