राज्यातील कोळी समाजाला टोकरे कोळीचेजात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

आ.एकनाथराव खडसे यांची विधानसभेत मागणी



मुंबई : 
 
राज्यातील समाजाला ‘टोकरी कोळी’ असे जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
 
आ.खडसे म्हणाले की, खर्‍या अर्थाने कोळी हा आदिवासी कोळी म्हणून पूर्वीपासून गणला गेलेला आहे. इतिहास काळापासून, वाल्मिकी ऋषींपासून आजपर्यंत कोळी समाज जंगलामध्ये, रानावनामध्ये राहणारा समाज म्हणून ओळखला जातो.
 
काही ठिकाणी कोळी समाजाला ‘टोकरे कोळी’ म्हणून कागदपत्रे देण्यात आलेली आहेत. जनगणनेनुसार टोकरे कोळींची संख्या
काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.
 
प्रामुख्याने जळगाव, धुळे आणि नंदुरबार तसेच महाराश्ट्रात इतर ठिकाणी आज अशी स्थिती आहे की, ठोकरे कोळीचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे शेकडो ग्राम पंचायतींमध्ये राखीव असलेल्या जागा रिक्त आहे.
 
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्येही संबंधितांना प्रमाणपत्र मिळाले नसल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आलेली आहे.
ठाकूर समाजाला आणि राजपूत समाजालासुध्दा या प्रकरणी काढण्यात आलेल्या शासन निर्णयांचा लाभ मिळत नाही.
 
ठाकूर समाजाला प्रमाणपत्र नाकारले जाते, राजपूत समाजालाही ‘भामटा राजपूत’ म्हणून प्रमाणपत्र नाकारले जाते. या समाजालाही आरक्षणाचा लाभ व्हावा, या दृष्टिकोनातून शासनाने पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
रक्ताच्या नात्यामध्ये पूर्वी प्रमाणपत्र देण्यात आले असेल तर त्याच्या मुलाला, मुलीला किंवा रक्तनात्यातील असणार्‍याला असे प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्यांच्या वारसांनाही तसे प्रमाणपत्र देण्यात येते. पण अद्याप कोळी समाजाला अशाप्रकारचे प्रमाणेपत्र देण्यात आले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
@@AUTHORINFO_V1@@