पानसरे हत्या प्रकरण : दोघे ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |



 
 
 
कोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणे शार्पशूटर भरत कुरणे आणि त्याचा साथीदार वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने ताब्यात घेतले आहे. यापैकी वासुदेव सूर्यवंशी हा मुंबईतील नालासोपारा येथील रहिवासी होता. या दोघांना शनिवारी दुपारी कडक बंदोबस्तात जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोघांच्या अटकेमुळे आता पानसरे हत्या प्रकरणी संशयितांची संख्या सात झाली आहे.
 

शार्पशूटर भरत कुरणे याला याआधी केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय), कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतले होते. अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम.एम कलबुर्गी यांच्या हत्येत भरत कुरणे याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. बेंगळुरू येथील कारागृहातून रात्री उशिरा कोल्हापूर एसआयटीने भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या दोघांचा ताबा घेतला. राजारामपुरी पोलीस ठाण्यात अटक दाखवून या दोघांची सीपीआरमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली. गेल्या आठवड्यात कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित अमोल काळे याला न्यायालयाने कोठडी सुनावली. अमोल काळे याची रवानगी बेंगळुरू येथील कारागृहात करण्यात आली आहे. अमोल काळेकडून एटीएसला काही धागेदोरे हाती लागले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@