राजपाल यादवला ३ महिन्यांचा तुरुंगवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : हिंदीमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव याला ३ महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. चेक बाउन्स झाल्याप्रकरणी ही शिक्षा दिल्ली उच्चं न्यायालयाने ठोठावली आहे. त्याचे बॉलिवूड करिअर डबघाईला आले असतानाच त्याला हा झटका बसला आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

राजपाल यादवने चित्रपट निर्मितीसाठी २०१० साली ५ कोटींचे कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम परत करण्यात असमर्थ ठरलेल्या राजपाल यादवच्या विरोधात संबंधित सुरेंदर सिंह यांनी कोर्टात धाव घेतली होती. 'अता पता लापता' या त्याच्या चित्रपटासाठी कर्ज घेतले होते. 'श्री नौरांग गोदावरी एंटरटेनमेंट' या त्याच्या कंपनीच्या नावावर दिल्लीच्या सुरेंदर सिंहकडून त्याने हे कर्ज उचले होते. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर राजपाल यादवला कोर्टाने १० कोटी ४० लाख रुपये संबंधित कंपनीला परत करण्यास सांगितले होते. राजपाल यादवने चेक दिल्यानंतर तो चेक बाउन्स झाला. त्यानंतर सुरेंदर सिंह यांनी वकिलामार्फत राजपाल यादवला नोटीस पाठवली होती. तरीही राजपाल यांनी पैसे परत केले नाही म्हणून अखेर त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@