धर्माविषयी राहुल गांधींना कन्फ्यूजन : सुषमा स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

 


 
 
जयपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस आपल्या जातीच्या बाबतीत आणि धर्माच्या बाबतीत कन्फ्यूझ आहेत. असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. याआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला चोख प्रत्युत्तर सुषमा स्वराज यांनी दिले आहे.
 

पंतप्रधान मोदी यांना हिंदू असण्याचा अर्थ माहीत नाही, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. असे राहुल गांधी म्हणाले, कारण राहुल आणि काँग्रेस हे आपली जात आणि धर्माच्याबाबतीत क्नफ्यूझ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांनी आपण सेक्युलर नेता असल्याचे जनतेला दर्शवत आहेत. परंतु निवडणुका जवळ आल्यावर जेव्हा राहुल गांधीच्या हे लक्षात आले की हिंदू मतदारांची संख्या जास्त आहे. तेव्हापासून राहुल गांधी हे स्वत:ची अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे म्हणत सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. पुढे सुषमा म्हणाल्या की, “राहुल गांधी हे स्वत:ला जानवे परिधान करणारे ब्राम्हण म्हणवतात. मला माहीत नव्हते की, जानवे परिधान करणाऱ्या ब्राम्हणाच्या ज्ञानात एवढी वृद्धी झाली आहे की आता हिंदू म्हणजे काय हे आम्हाला आता त्यांच्याकडून जाणून , घ्यावे लागेल. देव न करो की तो दिवस आताच येवो की आम्हाला हिंदू म्हणजे काय हे राहुल गांधींकडून जाणून घ्यावे लागेल!”

 

दरम्यान, उदयपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. हिंदुत्वाचे सार काय आहे? गीतेत काय लिहिले आहे? हे ज्ञान सर्वांना आहे. ज्ञान तुमच्या चारही दिशांना आहे. प्रत्येक सजीवाकडे ज्ञान आहे. आमचे पंतप्रधान म्हणातात की ते हिंदू आहेत, पण हिंदुत्वाच्या पायारचनेबद्दल त्यांना माहीत नाही. ते कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत?” अशी ही टिका होती. राजस्थानमध्ये २०० जागांवर ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ११ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. मागील निवडणुकांमध्ये भाजपने १६३ जागांवर विजय मिळवला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@