‘त्या’ शिक्षकाचा निलंबनाचा प्रस्ताव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

वाघळी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी विनयभंग प्रकरण

चाळीसगाव : 
 
राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाघळी येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनीला अश्लील चित्रफित दाखवून गैरवर्तन करणारा शिक्षक तथा सभापती बंटी ठाकूर याच्या निलंबनाचा प्रस्ताव शुक्रवारी संस्थेच्या सभेत संमत झाला.
 
सभेत प्रस्तावावर चर्चा झाली. त्यात ठाकूर याला निलंबित करावे असा निर्णय संस्थाचालकांनी घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हा प्रस्ताव निलंबनाच्या पुढील कारवाईसाठी शिक्षणाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे.
 
निलंबनाच्या प्रस्तावावर गावकर्‍यांनी असमाधान व्यक्त केले असून त्या शिक्षकाला कायमस्वरुपी सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी वाघळी ग्रामस्थांनी केली आहे.
बंटी ठाकूरच्या निलंबनाचा प्रस्ताव संस्थेच्या आज झालेल्या सभेत घेण्यात आला असून हा प्रस्ताव शिक्षणाधिकार्‍यांकडे परवानगीसाठी पाठविण्यात येणार आहे.
- अरूण निकम, सचिव
राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ
@@AUTHORINFO_V1@@