ओ. बी. सी. साहित्य संमेलन आज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

राज्यातून साहित्यिक दाखल, अनेक दिग्गजांची जळगावला उपस्थिती

 
जळगाव : 
 
ऐतिहासिकदृष्ट्या सांस्कृतिक व साहित्य परंपरा असलेल्या सुवर्णनगरी म्हटले जाणार्‍या जळगाव शहरात शनिवार, 1 डिसेंबर रोजी पहिलेच राज्यस्तरीय ओ. बी.सी. साहित्य संमेलन होत आहे.
 
 
ओ.बी.सी.फाउंडेशन इंडिया आयोजित या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी महसूल व कृषिमंत्री ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे आहेत तर संमेलनाध्यक्ष लेखिका, समीक्षक प्रा.डॉ.महालक्ष्मी मोराळे, पुणे ह्या आहेत.
 
 
सकाळी 9 वा. शहरातील नवीन बस स्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरापासून ग्रंथदिंडी निघणार असून यात शालेय कवी, लेखक, पदाधिकारी, साहित्यप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
 
यासाठी ओबीसी फाउंडेशनचे प्रवक्ते रत्नाकर मोराळे, प्रा. संध्या महाजन, तुषार वाघुळदे, माधुरी चौधरी यांचे सहकार्य लाभणार आहे. संमेलनाला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील साहित्यिक सहभागी होत आहेत.
 
संमेलन शनिवारी सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 10 पर्यन्त होईल. साहित्यप्रेमी व रसिकांना चांगलीच मेजवानी मिळणार आहे. संमेलन कांताई सभागृहात होईल.संमेलनात ग्रंथदिंडी, ओबीसी समाजाबद्दल चर्चा, विचारमंथन, परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांची काव्यमैफिल आदी कार्यक्रम होईल. संमेलनाचे बोधचिन्ह स्थानिक कलावंताने तयार केले आहे.
 
 
संमेलनात काही मान्यवर साहित्यिक, कलावंत, चित्रकार, सेवाभावी व्यक्तींचा सन्मानही करण्यात येणार आहे, असे ओ.बी.सी.फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोराळे संयोजन समितीचे सदस्य माधुरी चौधरी, (लेखिका औरंगाबाद ) कवी व कलावंत तुषार वाघुळदे तसेच नितीन चौधरी, संजय महाजन यांनी कळविले आहे.
@@AUTHORINFO_V1@@