कुंभमेळ्या दरम्यान होणार नाहीत लग्न!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
 
प्रयागराज : २०१९ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्नान दिवसांच्या दरम्यान प्रयागराजमध्ये एकही लग्न होणार नाही. असे प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कुंभमेळ्याच्या स्नान दिवसांच्या काही दिवस आधी आणि काही दिवसांनंतरही प्रयागराजमध्ये लग्नसोहळे होऊ नयेत. असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. पुढील वर्षी १५ जानेवारी ते ४ मार्चपर्यंत प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 

दरम्यान, कुंभमेळ्यातील या ठराविक दिवसांमध्ये प्रयागराजमधील कोणत्याही कुटंबांनी त्यांच्या घरातील लग्नसोहळ्यांसाठी शहरातील हॉल तसेच मंगल कार्यालयाची अॅडव्हान्स बुकिंग करू नये, असे आवाहन लोकांना करण्यात आले आहे. समारंभासाठीचे हॉल आणि मंगल कार्यालयाच्या मालकांना या संदर्भात नोटीस देण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या स्नान दिवसांदरम्यान कोणतीही बुकिंग घेऊ नये. असे निर्देश हॉल आणि मंगल कार्यालयाच्या मालकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार या स्नान दिवसांदरम्यान कोणतेही हॉल उपलब्ध नसतील असे हॉल मालकांकडून बुकिंग करणाऱ्यांना सांगण्यात येत आहे. लग्नाची तारिख पुढे ढकलण्याशिवाय आमच्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही. कारण या ठराविक तारखांना शहरातील कोणतेच हॉल लग्नासाठी उपलब्ध नाही आहेत.असे रवि कुमार केसरवानी यांनी सांगितले. रवि कुमार केसरवानी यांनी आधीच या स्नान दिवसांदरम्यान हॉलची बुकिंग केली होती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्नान दिवसांच्या दरम्यान लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. ऐन लग्नसराईचा मौसम असताना हा नियम लागू केल्यामुले हॉल आणि मंगल कार्यालयाच्या मालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील लग्नसोहळ्याच्या तारखा या दिवसांमध्ये निश्चित केल्या आहेत. त्यांना यावर पुनर्विचार करावा लागत आहे.

 

१०६ गेस्ट हाऊससह अनेक हॉल आणि मंगल कार्यालयांना यासंदर्भातील नोटीस बजावण्यात आली आहे. कुंभमेळ्या दरम्यान पवित्र स्नान करण्यासाठी अनेक भक्तगण लाखोंच्या संख्येने प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे लग्नाला आलेल्या पाहुण्यांना तसेच या भक्तगणांना एकमेकांमुळे पार्किंग आणि निवासाच्या कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागू नये. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. असे एडीएम अशोक कुमार कनौजिया यांनी ही माहिती दिली. तसेच कोणत्याही हॉल मालकाला केलेली बुकिंग रद्द करण्यास सांगण्यात आलेले नाही. हॉल मालक आणि बुकिंग करणारे यांमध्ये गैरसमजामुले गोंधळ निर्माण झाला आहे. लवकरच आम्ही यावर तोडगा काढू.” असे कनौजिया यांनी स्पष्ट केले. कोणत्याही हॉल मालकाला केलेली बुकिंग रद्द करण्यास सांगण्यात आलेले नाही. अजूनतरी असा कोणताही प्रकार झाल्याचे आम्हाला आढळलेले नाही. असे उत्तर प्रदेश राज्याचे कॅबिनेट मंत्री नंद गोपाल गुप्ता यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@