नक्षलींचा धुमाकूळ; तीन कोटींची वाहने जाळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |



एटापल्ली : गडचिरोली जिल्हात नक्षलवाद्यांनी तब्बल तीन कोटी रुपयांची वाहने जाळल्याची घटना घडली आहे. एटापल्ली तालुक्यात रस्त्याच्या कामावर असलेली १६ वाहने नक्षलवाद्यांनी पेटवली. यामध्ये दहा जेसीबी, एक ट्रॅक्टर आणि पाच डिप्पर अशा जवळपास तीन कोटी रुपयांच्या वाहनांचा यात समावेश आहे. आजपासून सुरु होणाऱ्या 'नक्षली शहीद सप्ताह'च्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या असून त्याचाच हा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात गट्टेपल्ली येथे रस्त्याचे काम चालू होते. अचानक त्याठिकाणी नक्षलवाद्यांनी येऊन वाहनांना आग लावली व स्ते कामावर असलेल्या मजुरांनाही रात्री उशिरापर्यंत डांबून ठेवले. सकाळ झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी कामगारांना काम केल्यास गोळ्या घालण्याची धमकी देत सोडून देण्यात आले.

 

दरम्यान, सुरक्षा यंत्रणाना नक्षलवाद्यांकडून घातपाताची पूर्वसूचना मिळाली होती. त्यानंतर सर्वत्र इशारा देण्यात आला होता. मात्र सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे आरोप होत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@