ही नाटके बघायलाच हवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |



मराठी रंगभूमीला तसा १५० वर्षांचा इतिहास आहे. यादरम्यान बरेच नाटके येऊन गेली. प्रत्येक नाटकाचे एक वेगळेपण होते. त्यामुळे हे विचार करताना खूप अवघड असेल की सर्वोत्तम कुठली? तरीही ही काही नाटके जी बऱ्याच कालावधीपासून चालत आली आहेत. अजूनही या नाटकांचे प्रयोग लावले जातात. कधी नव्या कलाकारांसोबत तर कधी जुन्या कलाकारांसोबत.

 

ती फुलराणी

 
 
 

ती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे.

 

लेकुरे उदंड झाली

 

 
 

वसंत कानेटकर यांनी लिहलेले लेकुरे उदंड झाली या नाटकाची सुरुवात २५ मे १९७३ रोजी झाली. त्यानंतर अनेकवेळा नवीन कलाकारांसोबत हे नाटक रंगभूमीवर आले.

 

ऑल दि बेस्ट

 

 
 

देवेंद्र पेम यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक गेली २० दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. या नाटकामुळे मराठीला अनेक स्टार्स मिळाले. भारत जाधव अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर ही त्यातली महत्वाची नावे.

 

मी नथुराम गोडसे बोलतोय

 
 
 

मी नथुराम गोडसे बोलतोय हे प्रदीप दळवी लिखित नाट्य आहे. गोपाळ गोडसे यांच्या 'मेय इट प्लिज यु होणार' या पुस्तकावर आधारित आहे.

 

तो मी नव्हेच

 

 
 

तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी "लखोबा लोखंडे" ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे.

 

कट्यार काळजात घुसली

 
 
 

कट्यार काळजात घुसली हे एक मराठी संगीतनाटक आहे. याचे कथानक दोन घराण्यांच्या गायकीचा संघर्षावर आधारित आहे. या नाटकात पं भार्गवराम आचरेकर, वसंतराव देशपांडे, प्रसाद सावकार, प्रकाश घांग्रेकर, बकुळ पंडित,फैय्याज इ. कलाकारांंनी यात काम केले आहे.

 

कुसुम मनोहर लेले

 

 
 

कुसुम मनोहर लेले हे १९८६ मधे पुण्यात घडलेल्या सत्य कथेवर आधारलेले नाटक. हे नाटक विनय आपटे यांनी दिग्दर्शित केले होते.

 

नटसम्राट

 

 
 

नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला.

 

सविता दामोदर परांजपे

 

 
 

हे नाटक शेखर ताम्हाणे यांनी लिहिले होते. हे नाटक "सायकोलॉजिकल थ्रिलर" प्रकारात मोडतो. रीमा लागू यांनी साकारलेली ही भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे

 

जाणता राजा

 

 
 

बाबासाहेब पुरंदरे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक नंतर हिंदी इंग्रजीसह ५ भाषांमध्ये भाषांतरित केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@