नगरपंचायतीत भाजपाची सत्ता आल्यास निधी कमी पडू देणार नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

ना. गिरीश महाजन यांची ग्वाही ; जामनेर शहर बदलले, शेंदुर्णीही बदलेल, विकासाला साथ द्या

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
शेंदुर्णी ता.जामनेर, १ डिसेंबर
भारतीय जनता पार्टीची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आहे. शेंदुर्णी ग्रा.पं.मध्ये मागील पंचवार्षिकला भाजपाची सत्ता होती. ग्रा.पं.चे नगरपंचायतीत रूपांतर झाले. ९ डिसेंबरला नगरपंचायतसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीतही भाजपाची सत्ता आणा. मागेल तेवढा निधी शेंदुर्णी गावाच्या विकासासाठी देईल. भाजपाच्या काळात शेंदुर्णीत झालेल्या विकासाला साथ देवून भाजपाचे सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून येत विरोधकांचा सुपडा साफ होईल. त्यासाठी सर्व कार्यकर्ते मतदार बंधू भगिनींनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन यांनी शेंदुर्णीत १ रोजी सकाळी ११ वा. त्रिविक्रम मंदिरात नगरपंचायत निवडणुकीच्या भाजपा उमेदवाराच्या प्रचार नारळ वाढविण्याच्या शुभारंभाप्रसंगी व्यक्त केले.
 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
प्रारंभी भाजपा उमेदवारांच्या हस्ते भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या मूर्तीला पूजा, अभिषेक करण्यात आला. ना. महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
 
 
ना. महाजन म्हणाले की, परवा महाराष्ट्र शासनाने मराठी समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व आगामी काळातही आर्थिकदृष्टया दुर्बल समाजालाही आरक्षण देण्याची व्यवस्था करू. शेंदुर्णी गावाचा तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात शेंदुर्णीतील विविध मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. शेंदुर्णी गावाचा पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्‍न असून भागपूर येथून २ हजार कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित करून शेंदुर्णीच्या पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी पाण्याची समस्या सुटेल, जमीन ओलीताखाली येईल. वाघूरचे पाणीही शेंदुर्णीत आणणार असून ती ७० कोटी रूपयाची योजना आहे.
 
 
शेंदुर्णी ग्रा.पं.ची निवडणूक जाहीर झाल्यानंतरही दोन दिवसात शेंदुर्णी नगरपंचायत करून आणली. हे काम आपलेच सरकार करू शकते. त्यामुळे शेंदुर्णीत नगरपंचायतील भाजपाची सत्ता आल्यानंतर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. शेंदुर्णीत बारी समाज, माळी समाज मंगल कार्यालयासाठी निधी दिला, मुस्लिम समाजाला शादीखानाला निधी दिला. मराठा समाजाला मंगल कार्यालय बांधकामासाठी निधी देवून लग्न सोहळ्यासाठी उपयुक्त मंगल कार्यालय उभे राहील तसेच शेंदुर्णीत आगामी काळातही कोणीही घरकुलापासून वंचित राहणार नाही. याची शासन व्यवस्था करणार आहे. त्यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले.
 
 
समयोचित भाषणे
खा.रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते, फर्डे वक्ते उत्तमराव थोरात, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, माजी जि.प. सदस्य बाबुराव घोंगडे, राजधर पांढरे, नामदेवराव बारी, भाजपा तालुका सरचिटणीस रजनीकांत शुक्ल, अझहर खान यांनीही प्रसंगोचित विचार व्यक्त केले.
 
 
... मान्यवर व निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर खा.रक्षाताई खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, भाजपा ज्येष्ठ नेते ऍड.शिवाजी सोनार, उतमराव थोरात, भाजपा जिल्हाध्यक्ष गोविंद अग्रवाल, प्रकाश झवंर, भाजपा जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जे.के.चव्हाण, महेंद्र बाविस्कर, दीपक तायडे, जितेंद्र पाटील, बाबुराव घोंगडे, राजधर पांढरे, रामेश्‍वर पाटील, नवलसिंग पाटील, संजय देशमुख, प्रफुल्ल लोढा, यशवंत पाटील, अशोक औटे, अजय जहागिरदार, नारायण गुजर, कडोबा सूर्यवंशी, तुकाराम पाटील, जामनेर उपनगराध्यक्ष अनीसभाई, भाजपा जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष इमामशेठ, भाजपा शहराध्यक्ष सुनिल शिनकर, कय्युम खान, कडोबा माळी, रशीद मौलाना, फरीद टेलर, श्रीकृष्ण चौधरी, दीपक जोहरे, अमृत खलसे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजयाताई खलसे, चंदाताई अग्रवाल, सुशीला ललवाणी आदींसह सर्व उमेदवार, परिसरातील सरपंच होते.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... 

 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
 
@@AUTHORINFO_V1@@