चौदाव्या वित्त आयोगाच्या 51 कोटीच्या निधीला लालफितीचा फटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

जि.प.च्या ग्रामपंचायत विभागाचा हलगर्जीपणा

 
 
जळगाव : 
 
जिल्हा परिषदेला 14 व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामीण भागातील विविध विकास कामासाठी 51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र ग्रामपंचायत विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा निधी लालफितीत अडकला असून,
 
तीन महिने उलटूनही निधी जि.प.च्या खात्यात वर्ग होऊ झालेेला नाही त्यामुळे त्यातून मिळणारे व्याजापोटीची 21 लाखांच्या रकमेचे नुकसान जि.प.चे झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जि.प.च्या स्थायी समितीत हा प्रकार उघडकीस आला.
 
याप्रसंगी अध्यक्ष ना. उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, एसीईओ संजय मस्कर, शिक्षण सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे उपस्थित होते. जि.प.ला चौदाव्या वित्त आयोगांतर्गत 51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
 
यासंदर्भात निधी जि.प.च्या खात्यात वर्ग करण्यासाठी सीईओंची स्वाक्षरी आवश्यक आहे. यासाठीची फाईल तीन महिन्यापासून जि.प.च्या टेबलावर फिरत असल्याचे सागण्यात आले.
 
ग्रामपंचायत विभागाकडून पाठपुरावा होत नसल्याने तीन महिन्यांपासून फाईलला मंजूरी मिळू शकली नाही. हा निधी जि.प.च्या बँक खात्यात वर्ग झाला असता तर साडेपाच टक्के व्याजदरानुसार तीन महिन्यात 21 लाख रुपये व्याजापोटी मिळू शकले असते.
 
मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जि.प.चे नुकसान होत आहे. एकीकडे निधीसाठी पदाधिकारी व सदस्यांमध्ये वाद सुरु असताना शासनाकडून मिळालेल्या अशा अनेक निधीच्या फाईली मंजूरीअभावी भटकंती करीत असल्याचा मुद्दा सदस्य नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला.
सौरउर्जा प्रकल्प देखभाल दुरुस्तीअभावी धूळखात
 
जिल्हा परिषदेच्या नविन इमारतीवर 81 लाख रुपये खर्चातून 40 के.व्ही. क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी हा प्रकल्प धुळखात पडला असून आता पुन्हा नव्याने लाखो रुपये खर्च करुन जनरेटर खरेदी करण्याचा घाट आखला जात असल्याचा मुद्दा नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला.
 
सुरुवातीला पाच वर्षे सर्व्हीस कॉन्ट्रॅक्ट असल्याने प्रकल्प व्यवस्थित होता. मात्र करार संपल्यानंतर देखभाल दुरुस्तीअभावी हा प्रकल्प बंद पडला आहे.
@@AUTHORINFO_V1@@