भारत, अमेरिका, जपान यांच्यात पहिली त्रिपक्षीय बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |


 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीला 'JAI' नाव दिले


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात अर्जेंटीना येथे सुरु असलेल्या जी-२० शिखर परिषदेमध्ये पहली त्रिपक्षीय बैठक पार पडली. तिन्ही देशांसाठी ही एक चांगली सुरुवात असल्याचे पंतप्रधान मोदी व जापानी पंतप्रधान आबे यांनी म्हटले आहे. एकमेकांसोबत काम करण्याची ही तिन्ही देशांना सुवर्णसंधी असल्याचेदेखील या नेत्यांनी म्हटले आहे.

 

पहिल्या त्रिपक्षीय बैठकी संदर्भात मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. या बैठकीला त्यांनी 'JAI' (जपान, अमेरिका, भारत) असे नाव दिले. यावेळी त्यांनी म्हटले, "अमेरिका आणि जपान हे दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. आजची ऐतिहासिक JAI बैठक एक चांगली सुरुवात आहे. तिन्ही देशातील कनेक्टिविटी, समुद्री सहयोग व स्थिर इंडो-पॅसिफिक या विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@