संरक्षण खरेदीसाठी सरकारकडून ३ हजार कोटी मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : लष्करी साहित्य खरेदीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या कराराला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षेतेखाली डिफेंस एक्विजिशन कमिटीची बैठक आज पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि अर्जुन रणगाडयासाठी एआरव्ही गाडया विकत घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 

लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ हजार कोटी रुपयांच्या खरेदीला संरक्षण अधिग्रहण परिषदने (डीएसी) मंजुरी दिली. यामध्ये भारत रशियाकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असलेले दोन लढाऊ जहाज विकत घेणार आहे. तसेच अर्जुन रणगाड्यासाठी एआरव्ही गाडया विकत घेण्यालादेखील मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

रशियाकडून घेण्यात येणाऱ्या या दोन जहाजांमध्ये ब्राह्मोस हे भारतीय बनावटीचे अत्याधुनिक क्षेपणास्त्र असणार आहे. भारत आणि रशियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. तसेच एआरव्ही गाडी डीआरडीओने विकसित केली असून या गाड्यांची निर्मिती सरकारी कंपनी बीईएमएल करणार आहे. यामुळे भारत-रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होणार असून भारताचे लष्करी बळ वाढणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@