स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनीट्रॅक्टर, उपसाधने पुरविण्याबाबत आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |
जळगाव : 
 
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने सन 2018-19 या वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत.
 
या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्व्ये कळविले आहे.
 
स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.
 
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
 
स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मान्यताप्राप्त उत्पादकांकडून प्रथम खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर खातरजमा केल्यावर शासकीय अनुदानाच्या 50 टक्के रक्कम बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल.
 
उर्वरित 50 टक्के अनुदान मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
 
ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी सदरहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे (परिवहन अधिकारी) व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
 
बचत गटाने अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्या कार्यालातून प्राप्त करुन परिपूर्ण अर्ज सादर करावे. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येतील याची नोंद घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी कळविले आहे.
@@AUTHORINFO_V1@@