कच्च्या तेलाच्या किमती आठ महिन्यांच्या निचांकावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2018
Total Views |


लंडन : जागतिक बाजारात पुरवठा वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती गेल्या आठ महिन्यांच्या निचांकावर पोहोचल्या आहेत. शुक्रवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलर प्रति बॅरलवरुन ६९.७८ डॉलरवर पोहोचल्या आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत येत्या काळात आणखी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाली. पेट्रोल १५ पैसे आणि डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले. मुंबईत पेट्रोल ८३.५७ रुपये आणि ७६.२२ पैशांनी स्वस्त झाले.

 

महिन्याभरात कच्च्या तेलाच्या किमतीत १८ टक्के घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये अमेरिका आणि इराण य़ांच्यातील प्रतिबंधांमुळे तेलाच्या किमतींचा भडका उडाला होता. परंतू ४ नोव्हेंबरपासून ईराणवर लागू केलेल्या प्रतिबंधातून भारतासह आशियातील देशांसाठी नियम शिथिल केल्याने कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घटत आहेत. युएस लाईट क्रुड ऑईल ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच २० टक्क्यांनी घसरले. अमेरिका, रूस आणि सौदी अरब येथील गॅस आणि तेल उत्पादक कंपन्या ईराणकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीतील तूट भरुन काढण्यासाठी उत्पादन वाढवत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढला आहे.

 

इराणमध्ये कच्च्या तेलाची निर्यात निम्म्यावर

 

इराणवर लावलेल्या निर्बंधांनंतर कच्च्या तेलाची निर्यात निम्मी घटली आहे. अमेरिका इराणवर निर्बंध घालून तेलाची निर्यात पूर्णपणे बंद करू इच्छित आहे. मात्र, नियम शिथील केल्याने प्रतिदिन बॅरल उत्पादन १५ लाखांवर येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यात निम्म्यावर पोहोचली आहे.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@