संवत्सराच्या पहिल्या दिवशी बाजार घसरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2018
Total Views |
 
 

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, रुपया मजबूत

 

मुंबई : दिवाळीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजारात शुक्रवारी उतार चढाव पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद झाले. सवंत्सर २०७५च्या पहिल्या दिवशी बाजारात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७९ अंशांनी घसरुन ३५ हजार १५९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३ अंशांच्या घसरणीसह १० हजार ५८५ अंशांवर बंद झाला.
 

जागतिक बाजारातील पडसादही दोन्ही निर्देशांकांवर उमटले. दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि मजबूत होत असलेल्या रुपयाची बाजार सावरायला मदत झाली. बीएसई मिडकॅप . टक्के वाढला तर निफ्टी मिडकॅप १०० एक टक्क्यांनी वधारला. बीएसई स्मॉलकॅपमध्ये . टक्क्यांची तेजी दिसून आली. बॅंक निफ्टी . टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईवर भारती एअरटेल, इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स आदी कंपन्यांचे शेअर .९३ टक्क्यांनी घसरले.

 

शुक्रवारी पीएसयू बॅंक, आयटी, रियल्टी, मेटल शेअर्समध्ये विक्री दिसून आली तर मीडिया, ऑटो, कंज्युमर्स ड्युरेबल्स, प्रायव्हेट बॅंक, फार्मा, ऑईल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. जागतिक बाजारातील मंदीचे, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांचे संकट असूनही रुपया मजबूत असल्याने बाजार सावरले. दरम्यान सवत्सर २०७४च्या शेवटच्या दिवशी मुहूर्त ट्रेडींगमध्ये सेन्सेक्स २४६ अंशांनी वधारला. निफ्टी .६५ टक्क्यांनी मजबूत होऊन ६८ अंशांनी मजबूत झाला. गेल्या दहा वर्षातील मुहूर्त ट्रेड़ींगमधली ही तेजी नोंदवण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@