आरबीआयकडून ३.६ लाख कोटी घेण्याचा प्रस्तावच नाही : सुभाष चंद्र गर्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून केंद्र सरकारने कोणत्याही रकमेची मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. आरबीआयकडून इतकी रक्कम घेण्याचा कोणताही मानस नसून प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहीती जात असल्याचे केंद्रीय अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी म्हटले आहे.

 

आरबीआय आणि केंद्र सरकारच्या वादावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले कि, आरबीआयकडून इतकी रक्कम घेण्याविषयी निर्णयच झाला नाही. आम्ही अशी कोणतिही रक्कम मागितलेली नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे. ते म्हणाले, केंद्र सरकार सध्या वित्तीय तूटीवर तोडगा काढण्यासाठी विचार करत आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ही ३.३ टक्के राहणार आहे. सरकारने कर्ज घेण्याच्या आकडेवारीत ७० हजार कोटींची कपात केली आहे.

 

आरबीआय आणि केंद्र सरकारच्या वादावर वृतांकन करणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांनाही खडेबोल त्यांनी सुनावले आहेत. ते म्हणाले, आरबीआयकडून केंद्र सरकार ३.५ लाख कोटी रुपये घेण्याच्या खोट्या बातम्या सध्या पसरवल्या जात आहेत. आमचा असा कोणताही प्रस्ताव नाही. केंद्र सरकार वित्तीय तुटीवर उपययोजना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@