कल्याणकारी योजनांसाठी असे उभारणार तीन हजार कोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2018
Total Views |
 
 
 

नवी दिल्ली केंद्र सरकारने एनिमी शेअर विकून पैसा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाक फाळणीनंतर पाकिस्तानात स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या मालमत्ता सरकारजमा करण्यात आल्या आहेत. त्यांना एनिमी शेअर संबोधले जाते.

 

केंद्र सरकारकडील अशा मालमत्ता विकण्याच्या प्रक्रियेला मंजुरी मिळाली आहे. देशातील तब्बल हजार कोटी रुपयांची संपत्ती विकण्याचा प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली आहे. देशातील 'एनीमी शेअर' मालमत्ता गेल्या कित्येक वर्षांपासून विनावापर पडून आहेत. या विनावापर असलेल्या विकण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता अनेक वर्षांपासून विनावापर पडून राहिलेल्या मालमत्ता आता विकता येणार आहेत. हे पैसे कल्याणकारी योजनांवर खर्च केले जाणार आहेत.

 

कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडियाकडे सध्या २० हजार ३२३ शेअरधारकांच्या ९९६ कंपन्यांमध्ये एकूण कोटी ५० लाख, ७५ हजार ८७७ शेअर आहेत. त्यातील ५८८ कंपन्या सक्रिय आहेत. १३९ कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झाली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@