फटाक्यांचा नियम मोडल्याने १९ जणांवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2018
Total Views |
 
 
ठाणे : दिवाळीत फटाके वाजवण्यासाठी घालून दिलेले निर्बंध न पाळल्याप्रकरणी ठाण्यात आत्तापर्यंत १९ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३३ (आर) १३१ यानुसार कारवाई केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
 

दिवाळीत ध्वनी व हवा प्रदुषण वाढत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० वेळेत फटाके फोडण्याचे नियम घालून दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी ठाण्यात चितळसर आणि कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

कल्याणमध्ये मानपाडा पोलीस ठाण्यात ८, विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये ६ आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये ५ अशा एकूण १९ जणांवर ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान फटाके फोडताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर असल्याचे पोलीसांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@