मुहूर्त ट्रेडिंगने बाजारात तेजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |
 
 

सेन्सेक्स २५० तर निफ्टी ६८ अंशांनी वधारला

 
 

मुंबई : शेअर बाजारात बुधवारी लक्ष्मीपूजनानिमित्त सायंकाळी ५.३० ते ६.३०च्या दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग पार पडले. लक्ष्मीपूजनानिमित्त दीड तासांच्या या विशेष सत्रात सेन्सेक्स २५० अंशांनी मजबूत झाला तर निफ्टी ६८ अंशांनी वधारला. मंगळवारी संवत्सराला तेजीने निरोप घेतलेले दोन्ही निर्देशांक मुहूर्तानिमित्त पुन्हा वधारले.

 
 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स वधारुन ३५ हजार २४१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १० हजार ५९८ अंशांवर बंद झाला. दरम्यान प्री ओपनिंगच्या वेळी सेन्सेक्स तिनशे अंशांनी मजबूत झाला होता. निफ्टी १० हजार ६०० पर्यंत पोहोचला होता. मुहूर्त ट्रेडिंगवेळी निफ्टी आणि सेन्सेक्सवरील सर्व शेअर वधारले. महिंद्रा एण्ड महिंद्रा कंपनीचा शेअर सर्वांत जास्त १.०९ टक्क्यांनी वधारुन ७९३.५० या स्तरावर बंद झाला. इन्फोसिसचा शेअर १.५३ टक्क्यांनी वधारला.

 
 

संवत्सर वर्ष २०७४च्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये ४१ अंशांची तेजी दिसून आली तर निफ्टी केवळ सहा अंशांनी वधारला होता. दरम्यान बुधवारी निफ्टीमध्ये सर्वात जास्त ऑटो इंडेक्स ०.९८ टक्क्यांनी वधारला. दिवाळी प्रतिपदेनिमित्त गुरुवारी शेअर बाजार बंद राहील. कमोडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी सायंकाळपासून ते रात्री ११.५५ पर्यंत ट्रेडिंग सुरू राहतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@