उपनिरिक्षक चिडे यांना मानवंदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |
 
 

चंद्रपूर : दारू तस्करांनी अंगावर गाडी घातल्याने ठार झालेले पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे यांना नागपूर पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. चंद्रपूरमध्ये दारू तस्करांचा पाठलाग करताना पोलीस उपनिरिक्षक चिडे यांच्यावर गाडी घालण्यात आली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

चिडे यांच्या कुटूंबियांना दहा लाखांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मंगळवारी चिडे यांचे पार्थिव त्यांच्या चंद्रपूरच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. बुधवारी सकाळी नागपूरच्या पोलीस मुख्यालयात पार्थिव आणण्यात आले व त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खा. विकास महात्मे, आमदार संजय धोटे, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

 

मारेकऱ्यांना कठोर शिक्षा!

 

चिडे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित पकडून कठोर शिक्षा करण्यात येईल. चिडे यांना शहिदाचा दर्जा देणार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांशी त्याबाबत चर्चा केल्याचे हंसराज अहिर यांनी सांगितले. चिडे यांच्या कुटूंबियांना दहा लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार असून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवारी चिडे कुटूंबियांची भेट घेऊन धनादेश सुपूर्द करणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@