रत्नापिंप्री जि.प.प्राथमिक शाळेतशालेय व्यवस्थापन समिती गठीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |
पारोळा, 6 नोव्हेंबर - तालुक्यातील रत्नापिंप्री येथील जि.प.प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी शिक्षक-पालक मेळावा घेण्यात आला.
 
यावेळी शाळेच्या आवारात हा मेळावा घेऊन शिक्षक- पालकांनी शालेय विद्यार्थी गुणवत्तेबरोबरच शाळेचा विकास विद्यार्थ्यांच्या प्रगतीसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
 
यावेळी शालेय शैक्षणिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी चर्चा झाली. याबाबत प्रत्येक वर्गाचे आरक्षण व शालेय व्यवस्थापन समितीच्या शासन नियमानुसार समिती गठीत करण्यात आली.
 
रत्नापिंप्री जि.प. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिनकर आत्माराम पाटील, उपाध्यक्षपदी संगीता संदीप पाटील, सदस्य हरिश्चंद्र भिकन पाटील, लताबाई प्रताप भील, धनराज बाबुलाल वानखेडे, शीतल शरद पाटील, अनिल रामू मराठे, सरिता रामचंद्र पाटील, भिकनराव दामू पाटील, रत्नाबाई लोटन पाटील, भगवान हिरामण पाटील, प्रशांत दत्तू पाटील, रितू भीमराव मराठे, सचिव सुनील बुधा सोलंखी अशी समिती गठीत करण्यात आली. यावेळी आजी-माजी पदाधिकारी, सदस्य शिक्षक-पालक रत्नापिंप्री, होळपिंप्री ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@