‘अभिनीत’चे बाल साहित्यिकांच्या हस्ते प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |

 
जळगाव, 6 नोव्हेंबर - आपल्या पारंपरिक सण उत्सवातील मी अनुभवलेली दिवाळी हे चांगल्या सामाजिक एकोप्याचे प्रतीक होते. गेल्या चार दशकांमध्ये दिवाळीतील स्थित्यंतरे पाहताना ते दिसत नाही, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.
 
आशा फाउंडेशनच्या अभिनीत मासिकाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर निशा पाटील, सानिका (स्वरा) जोशी, श्रीवरद सुतार, मृण्मयी कुळकर्णी व प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी उपस्थित होते.
 
अशोक जैन म्हणाले की, आम्ही दिवाळी साजरी करताना गल्लीतील पन्नास-साठ मुले एकत्र असायचो. आज तसे चित्र दिसत नाही. अभिनीत मासिकात माझी मुलाखत घेणारी सानिका हिने छान तयारी केली होती, तिचे प्रश्न निरागस होते, तिला जे वाटले ते तिने मनापासून विचारले.
 
त्यामुळे मी या मुलीशी काय बोलू शकेल असे वाटले होते. मात्र तिने मला बोलते केले. आशा फाउंडेशन सातत्याने वेगवेगळे उपक्रम करीत असते. त्यात नेहमीच समाजाला काही तर वेगळे देण्याची वृत्ती आढळते. अभिनीतचा दिवाळी अंक त्यामुळेच वाचकांच्या पसंतीस उतरेल, असे ते म्हणाले.
 
प्रास्ताविक गिरीश कुळकर्णी यांनी केले. बाल साहित्यिकांनी आम्हाला लेखनाची दिलेली संधी आत्मविश्वास वाढविणारी ठरली. ज्या मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या, त्यामुळे मोठी माणसे जवळून अनुभवता आली.
 
त्यांच्या चर्चेतून गोष्टी समजल्यात, असे म्हटले. सर्वांच्या हस्ते अभिनीतच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी शिव छत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ, प्रशांत महाशब्दे, जयांशू पोळ, सुनील निंभोरे, अनिल जोशी, किशोर कुळकर्णी, दिनेश दीक्षित, विनिता भट, उल्हास सुतार, विराज कावडिया, अमित जगताप उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@