चाबहार बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चाबहार बंदराच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. या प्रकल्पावरील बंदी शिथील करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. इराणवरील निर्बंधांवरून अमेरिकेने भारतासह आठ देशांना तेल खरेदीसाठी सूट दिलेली असताना आणखी भारतासाठी सामरिक दृष्ट्या महत्वाच्या प्रकल्पावरही बंदी शिथील केल्याने भारतासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

 
 

चीन आणि पाकिस्तानला शह देण्यासाठी भारत चाबहार बंदर विकसित करत आहे. हे बंदर पाकिस्तानच्या सीमेला लगत असल्याने या बंदराला सामरिक महत्त्व आहे. तसेच व्यवसायासाठीही हे बंदर भारताला फायदेशीर ठरणार आहे. या बंदराद्वारे भारताला इराण आणि अफगाणिस्तानमधील बाजारपेठ खुली होणार आहे. या बंदराच्या उभारणीत अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधामुळे अडचणी येत होत्या. परंतु आता अमेरिकेने भारताला या बंदराच्या विकासासाठी मुभा दिल्याने भारताला दिलासा मिळाला आहे. तसेच इराण- अफगाणिस्तानच्या रेल्वे मार्गाचाही प्रश्न यामुळे सुटला आहे.

 
 

अफगाणिस्तानच्या विकासासाठी चाबहार महत्त्वाचे

 

अमेरिकेने शांतीसेनेच्या मदतीने अफगाणिस्तानातील दहशतवाद नष्ट केला होता. सध्या अफगाणिस्तानच्या विकासासाठी चाबहार बंदर महत्त्वाचे आहे. दरम्यान, चाबहार बंदराच्या विकासाची भारताची भूमिका अमेरिकेने मान्य केली असून हे देखील एक कारण यामागे असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेने इराणवर आजपर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लागू केले आहेत. परंतु काही दिवसांपूर्वीच इराणकडून तेल खरेदीसाठी भारतासह चीन, ग्रीस, जपान, द. कोरिया, तैवान आणि तुर्कस्तानला तात्पुरती सूट देण्यात आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@