‘इंडियाज किड्स लार्जेस्ट फॅशन शो’मध्येमिशन स्कूलची प्राप्ती पटेल झळकली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |

 
नंदुरबार, 6 नोव्हेंबर - नुकतेच मुंबई येथे ‘इंडियाज लार्जेस्ट फॅशन शो’अंतर्गत घेण्यात आलेल्या इंडियाज किड्स फॅशन वीकमध्ये नंदुरबार येथील एस.ए.मिशन प्रायमरी इंग्लिश स्कूलमधील इयत्ता पहिलीतील 6 वर्षाची प्राप्ती पटेल हिने सहभाग नोंदवून नंदुरबारचे नाव सर्वदूर पोहोचविले.
 
नंदुरबार येथील एस.ए.मिशन प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पहिलीतील 6 वर्षाची चिमुकली प्राप्ती धर्मेंद्र पटेल हिने सुरुवातीला पुणे येथे झालेल्या ‘इंडियाज लार्जेस्ट फॅशन शो’ अंतर्गत झालेल्या इंडियाज किड्स फॅशन विकमध्ये सहभाग नोंदविला.
 
 त्यात तिची निवड मुंबई येथे झालेल्या फॅशन शोसाठी करण्यात आली होती. त्यातही तिने यशस्वीरीत्या सहभाग नोंदविला. प्राप्तीच्या या यशाने नंदुरबार जिल्हा तसेच मिशन हायस्कूलचे नाव सर्वदूर पोहोचविले. मुंबई येथे झालेल्या या फॅशन शोप्रसंगी विश्वसुंदरी सुश्मिता सेन यांच्यासह सिनेसृष्टी व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
प्राप्ती ही विमल विहारमधील रहिवासी धर्मेंद्र पटेल व सीमा पटेल यांची मुलगी आहे. प्राप्तीने तिच्या वाढदिवसानिमित्त रोप वाटप उपक्रम राबविला आहे.
 
तिच्या या यशाबद्दल एस.ए.मिशनचे कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी, चेअरमन आर.के.वळवी, इंग्रजी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदेश यंगड, एस.ए.मिशन ज्युनियर कॉलेज व हायस्कूलच्या प्राचार्या नूतन वर्षा वळवी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@