लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दीचा उच्चांक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |
10 कोटींच्या उलाढालीचा अंदाज
जळगाव, 6 नोव्हेंबर - लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी बाजारात अमाप गर्दीचा उच्चांक बघायला मिळाला. प्रमुख रस्ते ग्राहकांच्या गर्दीने फुलून निघाले होते. गर्दीचा सलग दुसरा दिवस असल्याने व्यापारी वर्गही आनंदित झाला होता.
 
लक्ष्मीपूजनासाठी मंगळवारी दिवसभर असंख्य ग्राहकांनी बाजारात येऊन खरेदी केली. पूजा साहित्य, झेंडू, शेवंती, कमळाची फुले यांना मागणी होती. तुलनेत झेंडूच्या फुलांची आवक जास्त झाल्याने दिवसअखेर 40 रुपये किलोप्रमाणे ही फुले विकली गेली.
 
सकाळीच हे दर 80 ते 100 रुपयेदरम्यान सांगितले जात होते. साळीच्या लाह्या, बत्तासे, लक्ष्मी मातेची मूर्ती, विविध प्रकारची मिठाई व नमकीन यांनाही मागणी होती.
 
कापड मार्केट, सराफ बाजार, गॅजेट्स, गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने यात मोठी उलाढाल बघायला मिळाली. फटाके विक्रीच्या दुकानात प्रामुख्याने लहान मुलांची गर्दी होती.
ऐनवेळी गर्दी वाढली
 
बाजारात ऐनवेळी गर्दी झाली आहे. गेल्या आठवड्यात उत्साह नव्हता. तेलाचे दर 3 ते 4 रुपयाने वाढले आहेत. संपूर्ण मार्केटचा विचार केल्यास दिवसाला सुमारे 10 कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज सचिन छाजेड यांनी व्यक्त केला.
 
‘त्या’ दोघी आल्या अन् मिठाई वाटून गेल्या
 
जळगाव ः सकाळी 10 वाजताची वेळ... गोलाणी मार्केटमध्ये नेहमीची वर्दळ सुरू झाली होती. शरद सायकल मार्टसमोर मोलमजुरी करून पोट भरणारे एक कुटुंब बसले होते. त्यात लहान मुलांचाही भरणा होता.
 
अचानक तेथे दुचाकीवर दोघी जणी आल्या. त्यातली एक पुढे आली. हातातील मिठाई आणि नमकीन तिने मुलांना देऊ केले. चिमुकली मुले आनंदली. दुसरीही गाडीवरून उतरून पुढे आली.
 
तिने नमकीनचे पाकिट देत या कुटुंबाचा आनंद द्विगुणीत केला. जेमतेम पाच मिनिटांचा हा प्रसंग. या दोघी जशा आल्या, तशा निघून गेल्या. कुठलीही अपेक्षा न करता प्रसिद्धीपासून लांब राहिल्या.
@@AUTHORINFO_V1@@