पहूरच्या लेले विद्यालयासमोर घाणीचे साम्राज्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

 
 
पहूर : येथील आर .टी. लेले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयासमोर घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी ट्रॉली ठेवण्याची मागणी मुख्याध्यापक सी. टी. पाटील यांनी केली आहे.
 
कचरा व्यवस्थापनासाठी शाळेने वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. मध्यंतरी कलाशिक्षक डी. वाय. गोरे यांनी चित्राद्वारे स्वच्छतेचे आवाहन केले होते तसेच अतुल लहासे यांनीही कचरा निर्मूलन मोहीम राबविली होती. मात्र, कचर्‍याची समस्या अद्यापही कायमच आहे.
 
शाळेच्या दर्शनी भागातच कचर्‍याचे ढीग साचले आहेत. परिसरातील रहिवासी कचरा टाकून निघून जातात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी पसरते. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशीच हा खेळ आहे.
 
ग्रामपंचायतीने या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन ट्रॉली ठेवल्यास कचर्‍याची समस्या कायमची निकाली निघेल. त्यामुळे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ट्रॉली ठेवण्याची मागणी ग्रामस्थांसह मुख्याध्यापकांनी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@