दिवाळी मागण्याची लोककला टिकवताहेत पहूरचे कलावंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |

 
पहुर, 6 नोव्हेंबर - ‘आली आली हो दिवाळी ..बहीण भावाला ओवाळी...’ असे म्हणत रात्री गावातून दिवाळी मागण्याची लोककला पहूरच्या कलावंतांनी टिकवून ठेवली आहे.
 
पाच दिवसांच्या दिवाळी उत्सवात रात्री घरोघरी जाऊन ग्रामस्थांकडून धान्य तसेच आर्थिक स्वरूपात दान मागून विविध लोकगीतांचा जागर करण्यात येतो. दिवाळीची मशाल घेऊन ती तेवत ठेवण्यासाठी तेलाची आहुती दिली जाते.
 
ग्रामदैवत मारुतीच्या दर्शनाने घरोघरी दिवाळी मागण्यास प्रारंभ होतो. लोकांनाही दिवाळी सणाला दान दिल्याचे पुण्य लाभत असते. सोनुबा धनगर यांनी या परंपरेस सुरुवात केली.
 
त्यांना रामकृष्णा राऊत, सुपडू माळी, सुकदेव बाळा धनगर, नागो माळी, अर्जुन घोंगडे आदींचे सहकार्य लाभले. लोककला लोप पावण्याच्या मार्गावर आहेत.
 
मात्र पहूर येथील लोककलावंत भागवत धनगर, शेनफडू धनगर, रामकृष्णा धनगर, भगवान धनगर हे दिवाळी मागण्याची लोककला टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुढील पिढीसाठी या वारशाचे जतन होणे गरजेचे असल्याचे मत मधुकर धनगर यांनी व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@