केस गेले चोरीला! नागपूरात घडला अजब प्रकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
नागपूर : आजवर सोने,चांदी,रोख रक्कम यांसारख्या वस्तूंची चोरी झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण केस चोरीला गेल्याची घटना प्रथमच नागपूरमध्ये घडली आहे. एका गाडीवर दरोडा टाकून तब्बल ७९ किलो केस चोरण्यात आले आहेत. शनिवारी रात्री बुटीबोरीतील नागपूर-हैदराबाद महामार्गावरील रुईखोरी भागात ही घटना घडली.
 

प्रदीप बाबू नेरला यांचा केसाचा व्यवसाय आहे. नागपूरातून १५ हजार रुपये किंमत मोजून ७९ किलो केस प्रदीप बाबू यांनी शनिवारी रात्री हे केस खरेदी केले होते. हे केस घेऊन ते गाडीने हैदराबादला जात होते. रुईखोरी या भागात त्यांच्या गाडीसमोर एक गाडी आडवी आली. या गाडीमध्ये पाचजण होते. त्यापैकी चौघांनी प्रदीप यांना गाडीतून बाहेर खेचले. प्रदीप यांना या पाचजणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रदीप बाबू यांना बाजूला ढकलून त्यांची गाडी घेऊन हे पाचजण फरार झाले.

 

या गाडीत ७९ किलो केस होते. घडलेल्या प्रकारानंतर प्रदीप यांनी बुटीबोरी पोलीस स्टेशन गाठले. घडलेल्या प्रकाराची माहिती प्रदीप यांनी पोलीसांना दिली. गाडीमध्ये केस असल्याचे कळल्यावर प्रथम पोलीसांनाही आश्चर्य वाटले. परंतु प्रदीप यांचा व्यवसाय समजून घेत बुटीबोरी पोलीसांनी ही तक्रार नोंदवली. सध्या बुटीबोरी पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@