हौशी कलावंतांचे प्रश्न सोडवणार :- आ. भोळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 
जळगाव, 5 नोव्हेंबर - हौशी रंगभूमीवर काम करणार्‍या जळगावातील कलावंतांचे प्रश्न सोडविण्याचे काम करणार आहे. जळगावचे सांस्कृतिक क्षेत्र विकसित व्हावे, यासाठी संभाजीराजे नाट्यगृह तसेच बालगंधर्व नाट्यगृहाचेे प्रश्न सोडवू, असे आश्वासन आ. सुरेश भोळे यांनी दिले.
 
रंगभूमी दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पहिल्यांदाच रंगभूमी दिन सर्व कलावंतांच्या वतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला मंजूषा भिडे, हर्षदा कोल्हटकर यांनी ‘माझी माय सरसोती’ ही बहिणाबाईंच गाणं गायलं.
 
यानंतर गोंधळ हा कलाप्रकार बुद्धभूषण मोरे, चंद्रकांत इंगळे आणि सहकार्‍यांनी सादर केला. यानंतर सर्व कलावंतांनी नटराज पूजन केले. आ. भोळे यांच्या हस्ते नटराजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
 
राज्य नाट्य स्पर्धा ही नवीन सभागृहातच व्हावी, भाडे हौशी कलावंतांना अत्यल्प ठेवावे तसेच जळगाव शहरातील सर्व संस्थांना नाट्यगृह वर्षातून एका दिवसासाठी मोफत उपलब्ध करून द्यावे, बालगंधर्व नाट्यगृहांची दूरवस्था दूर करावी व अद्ययावत करावे, जेडीसीसी बँकेचे सभागृह सुरू करावे, नवीन सभागृहामध्ये तालमींसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, यासह अनेक मागण्यांचे निवेदन आ. भोळे यांना देण्यात आले.
 
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जगदीश नेेवे, राजेंद्र देशमुख, शरद मुजुमदार, ओमप्रकाश शर्मा, अरुण सानप, सुरेश राजपूत, होरिलसिंग राजपूत, मोना तडवी, सुनील झवर, विनोद ढगे, अनिल मोरे, मंगेश कुलकर्णी, मंजूषा भिडे, सरिता खाचणे, हेमंत पाटील, योगेश बेलदार, योगेश पाटील, दीपक पाटील, राजू गुंगे, मोरेश्वर सोनार, किरण अडकमोल आदी कलावंत उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@