‘निरोगी’ आयुष्यासाठी पंचकर्म करावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

धन्वंतरी जयंती उत्सवानिमित्त डॉ. गर्गे दाम्पत्याचा सत्कार

 
 
जळगाव, 5 नोव्हेेंबर - निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदात पंचकर्म ही उपचार पद्धती आहे. प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी पंचकर्म करावे. दया, भावाने रुग्णाची सेवा करुन नव्या पिढीने पैशांच्या मागे न धावता निःस्वार्थ रुग्णसेवा करा, असा सल्ला डॉ. शिरीश गर्गे यांनी दिला.
 
शहरातील आयएमए हॉल येथे सोमवारी सायंकाळी धन्वंतरी जयंती उत्सवानिमित्त डॉ. गर्गे व त्यांच्या पत्नी विशाखा गर्गे या दाम्पत्याचा आयुर्वेदातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
 
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. पराग जहागीरदार तर डॉ. जयंत जहागीरदार, डॉ. राजेश पाटील, डॉ.सी.व्ही. कुलकर्णी, डॉ.उदय तळार आदी उपस्थित होते.
 
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. दीपक शिरुडे यांनी धन्वंतरी देवाची प्रार्थना करून केली. शहरात अनेक वर्षांपासून धन्वंतरी उत्सवा साजरा होत आहे. प्रास्ताविक वैद्य डॉ.टी.सी.चौधरी यांनी केले.डॉ.आनंदा दशपुत्रे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
  
परदेशात आयुर्वेदावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. येथील विद्यापीठात अनेक शाखा आयुर्वेदात कार्य करीत आहे. नव्या पिढीने आयुर्वेद शास्त्रावर प्रेम करून निःस्वार्थ सेवा केली पाहिजे तसेच नियमित सराव करून रुग्णांची सेवा करावी, असे सांगून डॉ. जयंत जहागीरदार यांनी आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@