राज्य शासनाचे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |



मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे. तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांना जाहीर झाला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षा कीर्ती शिलेदार तसेच फैय्याज, जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे यांच्या समितीने ही निवड केली. या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना हे पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@