रेल्वेतील फुकट्या प्रवाशांविरुद्ध मोहीम तीव्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

12 पथक नियुक्त

 

भुसावळ, 5 नोव्हेंबर - सणासुदीत दिवाळीतील गर्दीच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.
 
यासाठी संपूर्ण विभागात रेल्वेच्या वाणिज्य विभागाने मोठ्या स्थानकांवर 12 विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. फुकट्या प्रवाशांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे तर धावत्या गाडीतही स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे.
 
 
वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी शुक्रवारी भुसावळ विभागात साध्या वेशातील तिकीट निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.
 
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात बडनेरापासून ते नाशिक रोडपर्यंत आणि खंडवा ते भुसावळ जंक्शनपर्यंतच्या सर्वच मोठ्या रेल्वेस्थानकांवर फुकट्या प्रवाशांवर कारवाई होणार आहे
 
 
. रेल्वेचे उत्पन्न वाढावे म्हणून रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. आरक्षण नसताना आरक्षित डब्यातून प्रवास करणार्‍यांवरही कारवाई होणार आहे. साध्या वेशात टीसी तपासणी करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@