यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळींच्याअपात्रतेवर 12 नोव्हेंबरला होणार सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 
यावल, 5 नोव्हेंबर - नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्याविरुद्ध दाखल अपात्रतेच्या प्रस्तावावर जिल्हाधिकार्‍यांकडे 12 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. कोळी यांनी मुदतीत जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यांना अपात्र करावे, अशी याचिका नगरसेवक अतुल पाटील यांनी 31 ऑगस्टला जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल केली होती.
 
 
शहर विकास आघाडीचे गटनेते अतुल पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. शिवसेनेच्या सुरेखा शरद कोळी या 27 नोव्हेंबर 2016 रोेजी नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या.
 
 
मात्र, कलम 9 (अ) नुसार राखीव जागेवर निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराने निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. कोळी यांना अद्यापपावेतो हे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी याचिका 31 ऑगस्ट 2018 रोजी अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोेर राजे निंबाळकर यांच्याकडे दाखल केली होती.
 
 
जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडून या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. आता 12 नोव्हेंबरला जिल्हाधिकार्‍यांनी प्राप्त अहवाल व दाखल तक्रार, प्रतिवादी नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांचे म्हणणे ऐकून त्यावर सुनावणी ठेवली आहे.

23 महिने झाले जातीचे प्रमाणपत्र सादर नाहीच

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या लोकप्रतिनिधींनी जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या कालावधीत सादर केलेले नव्हते, त्यांना अजून सहा महिने कालावधी वाढवून दिला आहे. असे असले तरी या निर्णयाचा फायदा यावलच्या नगराध्यक्षांना मिळू शकत नाही. कारण त्यांनी आजपर्यंतदेखील जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. आता निवडणूक होऊन 23 महिन्यांचा कालावधी लोटला गेला आहे. अतुल पाटील, गटनेते, शविआ, यावल
@@AUTHORINFO_V1@@